मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? १६ आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा, अशा विविध याचिकांवर ही सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार नाही, एक-एक करून याचिकांवर विचार होईल, असं ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागेल, याची शक्यता कमी असल्याचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.तसेच, निवडणूक आयोगाला पुढील कारवाई करण्यासाठी स्थगिती द्यावी की नाही, याचा विचार घटनापीठाला करावा लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.