Type Here to Get Search Results !

शिंदे गटातील आमदाराची ठाकरे गटाला धमकी; 'चून चून के मारेंगे गिन गिन के...!



बुलढाणा: काल बुलढाणा येथील बाजार समितीच्या सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. या संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या राड्याचं समर्थन करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना धमकीच दिली आहे.



'शिवसेना के लोग पातळी छोडकर बात कर रहे हैं। आज तो राडा बहोत कम हो गया, पोलीस ने रोख लिया, उनको पता नही है की, संजय गायकवाड और उसके कार्यकर्ता कितने पागल है। ये आग्या मोहोळ की तरह डसनेवाले कार्यकर्ता है। अगर वो खवल जाते तो किसीके बाप को बाप समजते नही। अगर इसके बाद इन्होंने कूच भानगड करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे, गिन गिन के मारे जायेगे।' अशा हिंदी भाषेत गायकवाड यांनी आपल्या शैलीत शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.



दरम्यान, काल बुलढाण्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आमदार गायकवाडांनी विरोधी गटाच्या लोकांना धमकी दिली आहे. मात्र, धमकी देताना त्यांनी ज्या हिंदी शब्दांचा वापर केलाय त्याचीच जास्त चर्चा आता जिल्हाभर होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies