Type Here to Get Search Results !

भरधाव कारने ४ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; चिमुकल्याचा जागीच मृत्यू!



पालघर: पालघर जिल्ह्यात देवखोप झरी पाडा येथे भरधाव कारने ४ वर्षीय चिमुकल्याला जोरदार धडक दिली. या धडकेत  चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. दक्ष दीपक गोवारी (वय ४ वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. 



माहितीनुसार, देवखोप झरी पाडा येथे ४ वर्षीय दक्ष दीपक गोवारी हा चिमुकला अंगणात खेळत होता. त्याचवेळी नंदोर येथून आबाचा पाडाच्या दिशेने जाणारी भरधाव कार जात होती. भरधाव वेगात जाणाऱ्या या कारने दक्षला जोरदार धडक दिली.या धडकेत कारने दक्षला दूर फरफटत नेले. व दक्षचा जागीच मृत्यू झाला. 



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारसह कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies