Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

संध्याकाळ नंतर दिवस चांगला जाईल. अतिविचार करू नका. कौटुंबिक सहयोग उत्तम लाभेल. जुने आर्थिक मुद्दे मार्गी लागतील. स्थावर, शेती विषयक प्रश्न मार्गी लागतील. 



वृषभ:

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मुलांच्या अपेक्षा पूर्ण होतील. उधारी वसूल होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. नवीन योजनेकडे लक्ष लागून राहील.  स्थान बदलाची योजना यशस्वी होईल. 



मिथुन:

व्यवसायासंबंधी काही नवीन योजना स्फुरतील. आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा. आपल्या आवडीची कामे करायला मिळतील.  मित्रांना मदत कराल. हातातील कलेला वाव द्यावा. 



कर्क:

मित्रांचे उस्फूर्त सहकार्य लाभेल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील.  जुनी येणी वसूल होतील. बोलण्यातून लोकांना दुखवू नका. कामात मनापासून प्रयत्न करा. 



सिंह:

वरिष्ठ अधिकारी समस्या निर्माण करू शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता.  बोलण्यातून लोकांचा विश्वास संपादन कराल. कौटुंबिक कामे योग्य पद्धतीने कराल. दिनक्रम व्यस्त राहील. 



कन्या:

घरात शुभ कार्याविषयी चर्चा कराल. मित्रांवर पैसे खर्च कराल. दिवस उत्तम जाईल. इतरांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. व्यावहारिक सावधानता बाळगावी. 



तूळ:

कामाच्या ठिकाणी असणारे वाद संपुष्टात येतील. बोलण्यात कडवटपणा आणू नका. कामात काहीसे परिवर्तन शक्य. कामात स्त्रियांची मदत मिळेल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. 



वृश्चिक:

कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. धार्मिक कामासाठी पैसे खर्च होतील. स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जा. लोक आपला सल्ला मानतील. आजचा दिवस चांगला जाईल. 



धनू:

हातातील संधीचे सोने करावे. अति बोलू नका. रागावर नियंत्रण ठेवावे. घरगुती कामात संपूर्ण दिवस जाईल. दैनंदिन कामातील बदल लाभदायक ठरेल. 




मकर:

नियमांचे पालन करा. जुनी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मुलांसंदर्भात काही निर्णय घ्याल. दिवस सामान्य राहील. गरज असेल तरच घराबाहेर पडा. 



कुंभ:

तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. मोसमी आजारांपासून काळजी घ्यावी. कुटुंबासमवेत वेळ घालवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे. इच्छित प्रश्नाचे उत्तर मिळेल.



मीन:

प्रसंगांना संयमाने सामोरे जावे.  घरात कलहाचे प्रसंग येऊ देऊ नका. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.  अनाठायी खर्च संभवतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies