Type Here to Get Search Results !

ठरलं! शिवाजी पार्कवर दसरा मेळावा ‘हा’ नेता घेणार!



मुंबई:  शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा  यंदा कोण घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता हा शिवसेनेचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा एकनाथ शिंदे कायम राखणार आहेत.



दरम्यान, एकनाथ शिंदे या मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिवाजी पार्कवर होणाऱ्या या दसरा मेळाव्याच्या तयारीच्या हालचालींना आता वेग येणार आहे. सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. या मेळाव्यात भाजप नेते सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात  येत आहे. तसेच शिवसेना सोडून गेलेले नारायण राणे हे देखील शिवसेनेच्या मेळाव्यात हजार राहणार असल्याचे बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies