Type Here to Get Search Results !

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर शिंदे गटातील मंत्री भुसे यांची मोठी प्रतिक्रिया!




मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालायाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यावर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.



मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना मंत्री दादा भुसे म्हणाले, 'न्यायालयाचा निर्णय आपण स्वीकारत असतो. हे माझं व्यक्तीगत मत आहे. शिवाजी पार्क मैदानापेक्षा बीकेसी हे मोठे मैदान आहे. आमचा शिवसेनेचा मेळावा कदाचित मैदानावर अपुरा पडला असता. याच्यापेक्षा, त्याच्यापेक्षा असा काही विषय नसतो शिवसैनिक आपापल्या पद्धतीने काम करत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील, ज्या मैदानावर मेळावा होईल, तो भव्य दिव्य होईल', असे वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies