Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार २८ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष : उत्तम वाचन कराल. सामाजिक जाणीव कायम ठेवाल. जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. 



वृषभ:

घराची सजावट कराल. कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. मित्रांशी वाद घालू नका. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल. 



मिथुन:

एखादी आनंदवार्ता मिळेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.  जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल.


 

कर्क:

नातेवाईक भेटायला येतील. मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. दिवस आनंदात जाईल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. 



सिंह:

सहकार्‍यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका. थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. मित्रांकडून अनपेक्षित लाभ होतील. स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या. 



कन्या:

नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. अतिश्रमाचा ताण जाणवेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या.  जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. 



तूळ:

पोटाची तक्रार लक्षात घ्या. चांगल्या कामासाठी प्रवास होतील. कामात स्त्रियांची मदत होईल.  लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल. 



वृश्चिक:

मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या. क्रोधावर नियंत्रण ठेवा. संसर्गजन्य विकारांपासून सावध रहा. अधिकारी वर्गाची गाठ पडेल. काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. 



धनू:

परोपकाराची भावना जोपासाल. शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल.  गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. 



मकर:

चिकाटी कायम ठेवा. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नवीन कामासंदर्भात बोलणी होतील.  



कुंभ:

जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.  घरातील कामे आवडीने कराल. शिस्तीचा अतिरेक करू नका.  अतितिखट पदार्थ खाऊ नका. भागिदारीतून चांगली कमाई होईल. 



मीन:

फार गरज असेल तरच प्रवास करावा.  क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. वाहन चालवताना सावधानता बाळगा. जोडीदाराची प्रगती होईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies