Type Here to Get Search Results !

“मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाची याचिका फेटाळली तर ठाकरे गटाचे म्हणणे न्यायालयाने ...”!



मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान हे ठाकरे गटाला की शिंदे गटाला हा वाद कोर्टात गेला असून यावर शुक्रवारीच निर्णय येणार असल्याचे सांगितले जात आहे.



दरम्यान, शिवाजी पार्कवर शिवसेनेलाही मेळावा घेण्याची परवानगी मिळू नये याबाबत शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवसेना शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळली असून ही अंतरीम याचिका होती. सरवणकर यांना याचिका दाखल कऱण्याचा अधिकार नाही असे कोर्टाने म्हणले आहे.



तसेच, ठाकरे गटाचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे आता शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास ठाकरे गटाला परवानगी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies