Type Here to Get Search Results !

“शिवरायांच्या भूमीत पाकिस्तानी नारेबाजी अजिबात....”: मुख्यमंत्री शिंदेचे मोठे वक्तव्य!



मुंबई:  'शिवरायांच्या भूमीत पाकिस्तानी नारेबाजी अजिबात सहन केली जाणार नाही, अशा शब्दात ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.



दरम्यान, देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर गुरुवारी धाडसत्र राबवले आहेत. यामध्ये शंभरहून अधिक जणांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. त्यामुळे  पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी त्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडक शब्दात ट्विट केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies