Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार ५ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

खर्चावर नियंत्रण ठेवावे. मनावर कोणताही ताण घेऊ नये. आततायीपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. घरातील वातावरण आनंदी राहील.


वृषभ:

मेहनतीला मागे हटु नका.  कामात चांगली प्रगती करता येईल. आखलेल्या योजनांवर भर द्या. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. 


मिथुन:

आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो.


कर्क:

ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल. भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा.


सिंह:

अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामातील समस्या सोडवता येतील. मनात अनामिक भीती दाटून येईल. जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल.


कन्या:

घरात आनंदी वातावरण राहील. विरोधकांकडे लक्ष ठेवा. आर्थिक गणिते सुधारतील. योजनेला मूर्त रूप द्याल. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल.


तूळ:

हातातील काम पूर्ण होईल. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका. एखादी घटना मन खिन्न करू शकते. विरोधक नरमाईने घेतील. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा.


वृश्चिक:

लहान प्रवास घडेल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.


धनू:

मुलांचा उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. बचतीच्या योजना आखाव्यात. जोडीदाराशी सुसंवाद घडेल.


मकर:

निष्काळजीपणा करू नका. व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात.


कुंभ:

कामाची दिवसभर धावपळ राहील. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे. चांगले मनोरंजन घडेल.


मीन:

खर्चाला आवर घाला. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा. कामातील उत्साह व धडाडी वाढेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies