Type Here to Get Search Results !

‘कोरोना’ बाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली 'हि' मोठी घोषणा!



वाशिंग्टन: गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आता कोविड १९ संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. आता अमेरिकेतून कोविड-19 महामारी संपली आहे, असे बायडेन यांनी जाहीर केले आहे. त्यांनी रविवारी एका टीव्ही मुलाखतीत ही माहिती दिली.



जो बायडन म्हणाले की, अमेरिकेतील कोरोना महामारी संपली आहे. पण तरीही आम्ही यावर खूप काम करत आहोत. जो बायडन हॉलमध्ये बोट दाखवत म्हणाले की, येथे कोणीही मास्क घातलेला नाही. त्यामुळे मला वाटते की हे बदलत आहे. देशातील कोविड महामारीचा प्रभावीपणे अंत झाला आहे. 'आम्ही अजूनही कोरोना व्हायरसवर काम करत आहोत आणि अजूनही ही समस्या आहे. पण आपल्या देशात कोरोना संपलेला आहे, असे बायडन म्हणाले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies