Type Here to Get Search Results !

आईनेच अल्पवयीन मुलीला परपुरूषाशी संबंध ठेवण्यास पाडले भाग अन...!अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनेगाव येथे सामाजिक प्रथांचा दाखला देत आईने आपल्या मुलीलाच परपुरूषाशी संबध ठेवायला भाग पाडले. आईने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला 50 वर्षीय नराधमाच्या हवाली केले. या नराधमाने अल्पवयीन मुलीचे वारंवार लचके तोडले. सदर प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईसह नराधम आरोपीला अटक केली आहे. आबासाहेब भडांगे (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचेनाव आहे. प्राप्त माहितीनुसार, १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही इयत्ता ८ वी मध्ये शिकते. कोपरगाव तालुक्यातील वेस येथे राहाणारा आरोपी आबासाहेब भडांगे याची पीडितेच्या आईशी ओळख होती आणि त्याचे घरी येणे-जाणे होते. पंधरा दिवसांपूर्वी आई पिडीतेला म्हणाली की, तु आता वयात आली आहे, आपल्या समाजात वयात आल्यानंतर बाहेरच्या माणसाशी झोपावे लागते. मीही तेच केले होते आणि आता तुलाही करावे लागेल. मात्र, पीडितेने आपल्याला शाळा शिकायची असून असे घाणेरडे कृत्य करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोन-तीन दिवसातच आरोपी आबासाहेब हा पिडितेच्या घरी आला. त्यावेळी पीडितेच्या आईने तिला आबासाहेब याच्यासोबत झोप अन्यथा तुला पाहून घेईन अशी धमकी दिली. यावेळी आरोपी आबासाहेब याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरातील एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नराधम आरोपी दुसऱ्या दिवशीही घरी येणार असल्याने घाबरलेल्या अल्पवयीन पीडितेने गावातच राहणाऱ्या आपल्या मामे भावाचे घर गाठले आणि त्यांना सर्व हकिगत सांगितली. मामे भावाने पीडितेला धीर देत राहाता पोलीस ठाण्यात आरोपीवर लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडीत मुलीच्या मामेभावाच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पोलिसांनी नराधम आरोपी आबासाहेब भडांगे आणि त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या पीडितेच्या आईला ताब्यात घेतले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies