Type Here to Get Search Results !

औरंगाबादहून बेपत्ता झालेली युट्यूबर बिंदास काव्या ‘येथे’ सापडली; जाणून घ्या काय झाले ते....!

 


औरंगाबाद : जिचे युट्युबवर 43 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्या काव्याच्या व्हिडिओची सोशल मिडियात सातत्याने चर्चा असते तीच औरंगाबादची काव्या ही शुक्रवारपासून गायब होती. युट्यूबर बिंदास काव्याचा शोध लागला असून ती मध्यप्रदेशातील इटारसी येथे पोलिसांना सापडलेली आहे. मनमाडहून ती लखनऊला जात असताना इटरसी येथे पोलिसांना आढळून आली आहे. बेपत्ता होताच काव्याच्या आईने एक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता. त्यानंतर अधिक चर्चेत आलेली काव्या 24 तास उलटून जाण्यापूर्वीच सापडली आहे. त्यामुळे तिच्या लाखो फॅन्सला दिलासा मिळाला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, काव्या ही मूळची औरंगाबादची आहे. युट्युबवर तिचे 43 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत म्हणूनच तिची ओळख ही युट्युबर अशी बनली आहे. काव्या ही रागाच्या भरात घर सोडून गेली होती. घरातून रागाच्या भरात निघून गेलेली काव्या ही मनमाडहून थेट लखनऊकडे निघाली होती. शुक्रवारी दुपारी 2 वाजता घरातून बेपत्ता झालेली काव्या ही शनिवारी दुपारपर्यंतच पोलिसांना सापडली आहे.



दरम्यान, मध्य प्रदेशातील इटारसी येथे आली असता ती पोलिसांना सापडली आहे. काल औरंगाबादहून मनमाड आणि तेथून थेट लखनऊकडे जाण्याचा तिचा मानस होता. मात्र, ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती इटारसी येथील पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन ती सापडली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies