मुंबई- एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला व यामुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. दरम्यान, सदर राजकीय घडामोडींना दोन महिनेच उलटले असताना राज्यात पुन्हा एकदा राजकारण वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता शिवसेनेनंतर महाराष्ट्र काँग्रेस मधील काही माजी मंत्री आणि आमदार फुटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच येत्या ऑक्टोबर महिन्यात शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.