Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार २० सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. संगत योग्य आहे काय ह्याचा विचार करा. खर्चात वाढ होऊ शकते. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्‍याची गाठ पडेल. 



वृषभ:

दिवस आनंदात घालवाल. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पट‍वून द्या. जुने वाद संपुष्टात येतील.



मिथुन:

बचतीच्या योजना आखाल. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यायामाला नव्याने सुरवात करा.



कर्क:

धार्मिक कामात सहभाग घ्याल. अति हळवे होऊ नका. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक सुखात वृद्धी होईल.



सिंह:

आत्मविश्वास वाढीस लागेल. तुमची लोकप्रियता वाढेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील. जुने छंद जोपासावेत.



कन्या:

डोकेदुखीचा त्रास संभवतो. श्रमाला घाबरून चालणार नाही. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. उगाचच कच खाऊ नका.



तूळ:

आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. जोडीदाराचा वरचष्मा राहील. झोपेची तक्रार जाणवेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अनाठायी बडबड टाळावी.



वृश्चिक:

एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील. आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. रूचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. 



धनू:

जवळच्या मित्रांची गाठ पडेल. आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळचा प्रवास सुखकारक होईल.



मकर:

आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. इतरांना आनंदाने मदत कराल. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा.



कुंभ:

कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. खोल विचार करण्याची तयारी ठेवा.



मीन:

कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. धार्मिक कामात रस घ्याल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies