Type Here to Get Search Results !

"एकनाथ शिंदे कोणत्या अधिकाराने शिवसेनेच्या चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे गेले?"


नवी दिल्ली:  राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे. दरम्यान, सुनावणीला सुरूवात होताच ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे १९ जुलैला निवडणूक आयोगात गेले होते असा युक्तिवाद कोर्टात कपिल सिब्बल यांनी केला. 



यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले?  ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले होते, असा सवाल घटनापीठाने विचारला.



दरम्यान, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असे घटनापीठाने म्हटले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies