नवी दिल्ली:आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,००० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
तसेच, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५१५ रुपये आहे.