Type Here to Get Search Results !

‘या’ दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडणार; 'हे' ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित!



मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम येथे उद्या पार पडणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे सर्व प्रदेश पदाधिकारी व शहर-जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान, राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप संपला नाही आहे.तसेच, राष्ट्रीय स्तरावर शरद पवारांना युपीएचे चेअरमन करण्याची मागणी वारंवार केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिशा स्पष्ट होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies