Type Here to Get Search Results !

‘….म्हणून आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’; शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल!



मुंबई: शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी आता शिंदे गटाकडूनही हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘खरी शिवसेना आमचीच, आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’ अशी मागणी या मध्यस्थी याचिकेतून करण्यात आली आहे. 



दरम्यान, शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा परवानगीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यातच मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली आहे. अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केलेली असताना, आता दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा हायकोर्टात मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies