मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.दरम्यान, आता त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,'अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.