पुणे: पुणे शहरातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया मधील विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. कामाक्षी बोहरा (वय २५) असे या तरुणीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कामाक्षी ही मूळची झारखंड येथील रहिवासी होती. पुण्यातील एफटीआयआय या संस्थेत ती शिक्षण घेत होती. आज, गुरुवारी ती सकाळी लेक्चरला आली नाही. त्यामुळे शिक्षकांनी ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर खोलीमध्ये ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
दरम्यान, वैफल्यग्रस्त असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.