Type Here to Get Search Results !

“I Love You म्हण नाही तर.....”; युवकाला अटक!



औरंगाबाद: जिल्ह्यात मला आय लव्ह यू म्हण नाहीतर तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावेल व्हायरल करेल अशी धमकी महिलेला देणाऱ्या एका तरुणावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सचिन दाभाडे असे संशियताचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, सचिन आणि तक्रारदार महिला परिचित आहेत. त्याने महिलेशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर वारंवार संपर्क साधून आय लव्ह यू म्हणाली नाहीस तर तुझे फोटो गल्लीतील मुलांच्या ग्रुपवर व्हायर करेल अशी धमकी दिली. याबराेबरच तुझ्या नवऱ्या विषयी तुला काही सांगायचे आहे असे सांगून तिचा व्हाट्सअप क्रमांक इंस्टाग्राम आयडी व पासवर्ड घेतला. यातून सलगी निर्माण करत महिलेला धमकी दिली. महिलेने तो नंबर ब्लॉक केला तर तो इतर नंबर वरून फोन करून शिवीगाळ करू लागला. 



दरम्यान, महिलेने याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies