Type Here to Get Search Results !

‘या’ IPL खेळाडूवर बलात्काराचा आरोप; क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय!



नवी दिल्ली: आयपीएल खेळणाऱ्या एका खेळाडूवरती बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पण त्याने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या तो कॅरिबियन दौऱ्यावर आहे. तो तिथून दौरा अर्धवट सोडून परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघातून तो खेळाडू खेळला आहे.



माहितीनुसार, ज्या मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे, ती मुलगी 17 वर्षाची आहे. त्याचबरोबर ही मुलगी नेपाळची आहे आणि खेळाडू सुध्दा नेपाळचा आहे, मुलीची वैद्यकीच चाचणी झाल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. संदीप लैमिछाने असे नेपाळी खेळाडूचे नाव आहे. 



दरम्यान, नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनने संदीप लैमिछाने यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्याला निलंबित केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies