Type Here to Get Search Results !

रेल्वेखाली जाणाऱ्या व्यक्तीचे RPF जवानाणे वाचवले प्राण: पहा ‘हा’ थरारक व्हिडीओ!



पुणे : पुणे स्थानक परिसरात एका प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, तो फलाटावर कोसळला. हा व्यक्ती रेल्वेखाली खेचल्या जाणार इतक्यात, तेथे कर्तव्यावर असलेला एक आरपीएफ आरपीएफ जवानाने या प्रवाशाला बाजूला खेचत त्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण प्रकार  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  ही घटना शनिवारी (४ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास घडली. हैदराबादहून पुण्याकडे येणारी हुसैन सागर एक्सप्रेस पुणे रेल्वेस्थानकावर थांबली होती. त्याचवेळी गाडी पुढच्या स्टेशनवर जाण्यासाठी निघाली असता, एका प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उडी मारली. गाडीचा वेग जास्त असल्याने हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर कोसळला. रेल्वेसोबत तो खाली खेचला जाणार इतक्यात तेथे कर्तव्यावर असलेल्या एका आरपीएफ जवानाने त्याला बाजूला खेचले.

पहा व्हिडीओ:

 



दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies