Type Here to Get Search Results !

इन्स्टाग्रामवर अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, म्हणून 19 वर्षीय तरुणाने.....!




पुणे: पुण्यात एका १९ वर्षीय मुलाने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाला त्याचे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. शंतनू वाडकर असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  प्रसिद्ध सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर प्रीथ यादव या युजरसोबत . शंतनू वाडकरची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. प्रीथ यादव नावाच्या इंस्टा युजरकडे शंतनूचे अर्धनग्न फोटो होते, ते अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने शंतनूला दिली आणि त्याच्याकडून पैसे उकळले. 



दरम्यान, सतत त्याला ते फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत तो त्याच्याकडून पैसे उकळू लागला. त्यामुळे शंतनूने या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies