Type Here to Get Search Results !

आटपाडी येथे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या “गुणगौरव पुरस्कार- 2022” चे आयोजन!



आटपाडी:  ‘एकता हि शक्ती आहे’, या उक्तीप्रमाणे आटपाडी मधील काही अधिकारी, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, शिक्षक, व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या मंडळीनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आधार फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शेक्षणिक, अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य हे करत आहेत. गेल्या 4-5 वर्षांपासून फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.



यासाठी कार्यरत असणारे आधार फाउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ.विनायक पवार उपाध्यक्ष मा.पंढरीनाथ (नाना) नागणे, सेक्रेटरी मा.मधुकर माळी, खजिनदार मा.संताजी देशमुख सर यांसोबतच अनेक सदस्यांच्या सहभागातून व मार्गदर्शनातून आधार फाउंडेशन चे कार्य चालत असते आज हि संस्था रजिस्टर असून यामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात.




उद्या शुक्रवार दिनांक 14-10-2022 रोजी सकाळी 9 वाजता जवळे मल्टीपर्पज हॉल आटपाडी येथे आधार फाउंडेशन च्या माध्यमातून देण्यात येणारा “गुणगौरव पुरस्कार- 2022” चे आयोजन करण्यात आले आहे, तसेच, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत.



दरम्यान, या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून संगीत मैफिल, मराठी गझल मुशायरा, वृक्षारोपण, वृद्धांसाठी मोफत आरोग्य शिबीर, व वृद्धासाठी आधारकाठी वाटप कार्यक्रम ठेवला आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आधार फाउंडेशन च्या मार्फत सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies