Type Here to Get Search Results !

कोल्हापुर: तालमीत कुस्तीच्या सरावानंतर 23 वर्षीय पैलवानाचा मृत्यू!



कोल्हापूर : कोल्हापूरातल्या तालमीत काल एका 23 वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला. मयत पैलवानाचे  नाव मारुती सुरवसे असून, मुळं गाव पंढरपूर जिल्ह्यात आहे. 



माहितीनुसार, मारुतीचे वडिल त्यांच्या गावी वखारीत शेती करतात. मारुतीला कुस्तीमध्ये करिअर करायचं असल्याने वडिलांनी त्याला कोल्हापूरमध्ये ठेवलं होतं. मागच्या वर्षापासून मारुती कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करीत होता. काल रात्री त्याने नेहमीप्रमाणे कुस्तीचा सराव केला. त्यानंतर तो अंघोळीसाठी गेला, त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. 



दरम्यान, डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे  घोषित केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies