Type Here to Get Search Results !

‘येथे’ चाईल्ड केअर सेंटरमध्ये माजी पोलीसानेच केला गोळीबार; 34 जणांचा जागीच मृत्यू!




बँकॉक: थायलंडमध्ये एका चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या अंदाधुंद गोळीबारात एकूण 34 जीव गेले आहे. मृतांमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. हल्लेखोर आरोपी माजी पोलीस असल्याची माहिती समोर आहे. 



माहितीनुसार, नॉन्ग बुआ लम्फू प्रांतात हल्लेखोरांनी मुलांना आणि प्रौढांना आपला निशाणा बनवलं. अनेकांवर त्यांना चाकूनेही हल्ला केला. चाईल्ड केअर सेंटरमध्ये गोळीबार केल्यानंतर हल्लोखोर त्याच्या घरी गेला. तेथे त्याने पत्नी आणि मुलाचीही हत्या केली. त्यानतंर स्व:ताला गोळी मारुन आत्महत्या केली. पन्या खमराब असे आरोपीचे नाव आहे. या आरोपी माजी पोलीस अधिकाऱ्याचे वय 34 वर्षे आहे. तो जवळच्याच पोलीस ठाण्यात तैनात होता. काही काळापूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले  होते.



दरम्यान, हल्ल्यामागचा हल्लेखोराचा हेतू अजूनतरी स्पष्ट झालेला नाही. तसेच या हल्ल्यात किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies