Type Here to Get Search Results !

“शिंदे गटाकडे मेळाव्यासाठी 52 कोटी आले कोठून; उद्या गौप्यस्फोट करणार”




मुंबई: आज होणाऱ्या दसरा मेळाव्याला गर्दी जमा करण्यासाठी शिंदे गटाकडून राज्यभरातून एसटी आरक्षित करण्यात आल्या असून यासाठी महामंडळाला तब्बल १० कोटी रुपये दिल्याचे बोलले जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवरुन चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका करत आपण एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा  दिला आहे. 



खैरे म्हणाले, शिवाजी पार्कवरील मेळावा हाच खरा दसरा मेळावा आहे. बाळासाहेबांनी म्हटलं होत कि, उद्धवाला सांभाळा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शिंदे गटाकडे करोडो रुपये आहेत, म्हणूनच ते पैसे खर्च केले जात आहेत. मेळाव्यासाठी 52 कोटी खर्च केले हे पैसे कोठून आले, याची आपण माहिती घेत पुरावे गोळा करत आहे. शिवाय दोन दिवसात संभाजीनगरमध्ये तक्रार दाखल करू हा सर्व प्रकार उघड करणार असल्याचा इशारा खैरे यांनी शिंदे गटाला दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies