पणजी : गोव्याचे माजी परिवहन मंत्री पांडूरंग राऊत यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. पांडूरंग राऊत यांच्या निधनाबाबत त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पांडूरंग राऊत हे गोवा प्रजा पक्षाचे नेते होते. 1991ते 1994 या काळात पांडूरंग राऊत हे कॅबिनेट मंत्री होते.राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अखेर आज पहाटे त्यांचे निधन झाले.