Type Here to Get Search Results !

मोठ्या उत्साहात "या" ठिकाणचा पारंपारिक सिमोल्लंघन सोहळा संपन्न



म्हसवड/अहमद मुल्ला : अनेक राज्यांतील असंख्य भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या मंदिरातील सिमोल्लंघनाचा सोहळा मोठ्या थाटात, शाही पद्धतीने संपन्न  करण्यात आला.


दसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता मंदिरातील श्रींच्या उत्सव मूर्ती मंदिराला प्रदक्षिणा घालून मुख्य पुजारी सालकरी यांच्या निवासस्थानी बसविण्यात आल्या. संध्याकाळी पाच वाजता, सालकऱ्यांच्या निवसस्थानातून मूर्ती आणून त्या सजवलेल्या पालखीत बसवून ही पालखी श्रींची आरती ,सालकरी, पुजारी, श्री नाथ मठाचे मठाधिपती, राजदंडधारी पुरोहीत, डवर वाजवणारे डवरी, ढोल वाजवणारे घडशी, सेवेकरी, भाविक हा सर्व लवाजमा मुख्य पेठेतून माणगंगा नदीच्या  तिरावर जाऊन त्याठिकाणी तुळजा भवानी व रेणुका मातेची पालखी आल्यानंतर धार्मिक विधी उरकून "सोने लुटण्याचा" कार्यक्रम झाला. व तेथून माणगंगा नदीपात्राच्या अलिकडील बायपास रोडने, विठ्ठल मंदीर, बाजार पटांगण, बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, वेशीतून मुख्य पेठेतून पुन्हा मंदिरात ही मिरवणूक आली.


शिलंगणावरून आलेल्या श्रींना पुजारी मंडळीच्या सवाष्णींनी औक्षण करून, ओवाळून आशिर्वाद घेतले. तद्नंतर उत्सव मूर्ती सालकऱ्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आल्या. रात्रीची श्रींची आरती झाल्यानंतर सालकऱ्यांच्या निवासस्थानातून श्रींच्या उत्सव मूर्ती मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मूळ ठिकाणी स्थानापन्न करण्यात आल्या.अशा प्रकारे  पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत येथील पारंपारिक पद्धतीचा सीमोल्लंघन सोहळा संपन्न झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies