Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष :

वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका.  मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. रागावर नियंत्रण ठेवावे. आपली ऊर्जा कामी लावा. 



वृषभ:

स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. मन स्थिर ठेवा.



मिथुन:

भविष्याचा विचार करून योजना आखा. कौटुंबिक समाधान लाभेल. काही समस्यांचे निराकरण होईल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. 



कर्क:

केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा.  आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. दिवस मनाजोगा घालवाल. घरासाठी खरेदी कराल.



सिंह:

आत्मविश्वास वाढीस लागेल.  कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. 



कन्या:

मनाचा गोंधळ टाळावा. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल.  कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. 



तूळ:

मित्रांचा सल्ला घ्याल. वाहन जपून चालवा. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. 



वृश्चिक:

घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल. आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. नकारात्मक विचार दूर ठेवावेत.  महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. 



धनू:

कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल. मदतीचे समाधान मिळेल. आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. 



मकर:

जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. जबाबदार्‍या वाढतील. वरिष्ठांना नाराज करू नका.  जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. 



कुंभ:

कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे.  तडकाफडकी निर्णय घेऊ नका. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. 



मीन:

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.  गरज ओळखून पैसे खर्च कराल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.  घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies