Type Here to Get Search Results !

‘हि’ मोठी योजना शेतकऱ्यांसाठी राबविणार; देवेंद्र फडणवीस!मुंबई: वर्ध्याच्या जिल्हा परिषदेतील सिंधूताई सपकाळ सभागृहात नियोजन समितीची सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला.आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना एनडीआरएफच्या दुप्पट निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ५२ टक्के पैसे शेतकर्यांच्या खात्यात वर्ग झाले असून उर्वरित आठवडाभरात वर्ग होतील, असे जिल्हाधिकार्यांानी सांगितले. ६५ मि.मी. पाऊस झाला नसेल पण सातत्याने पाऊस झाला असेल आणि ३३ टक्यांपेक्षा नुकसान झाले असेल तर शेतकर्यां ना मदत देण्याचा निर्णय घेतला', असेही फडणवीस म्हणाले.तसेच, शेतीच्या फिडरचे सोलरायजेशन करण्याची योजना राज्य सरकारने हातात घेतली आहे. जिथे फिडर स्वतंत्र झाले आहे तेथे जागा उपलब्ध केल्यास सोलर लावून फिडर सोलरवर ट्रान्सफर करू. त्यामुळे शेतकर्यांना दिवसा बारा तास मिळू शकेल. शासकीय जागा असल्यास शासकीय जागा घेऊ अथवा शेतकर्यांची जमीन तीस वर्षांच्या लीजवर मालकी त्यांच्याकडे घेऊ त्यांना भाडे देऊ असे मॉडेल तयार केले आहे. सोलरायजेशन केलं तर एजी फिडरवरील विजेचा प्रश्न सोडवू शकतो, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies