Type Here to Get Search Results !

पोलीस महासंचालकांची काचेच्या तुकड्याने गळा चिरून हत्या!



जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे पोलीस तुरूंग महासंचालक हेमंत लोहिया यांची सोमवारी (3 ऑक्टोबर) रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. 



माहितीनुसार, हेमंत लोहिया हे 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सोमवारी त्यांचा मृतदेह त्यांच्या निवास्थानी आढळून आला. लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांच्या पायाला तेल लावले असल्याचे आढळून आले. त्यांचा पाय काहीसा सुजला होता. मारेकऱ्याने लोहिया यांना गुदमरून ठार केले. त्यानंतर केचअपच्या बॉटलच्या काचेच्या तुकड्याने त्यांचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लोहिया यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies