Type Here to Get Search Results !

‘येथे’ फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, १२७ जणांचा जागीच मृत्यू!



नवी दिल्ली: इंडोनेशियामध्ये  शनिवारी रात्री फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात जवळपास 127 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लहान मुलांसह पोलिस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.



माहितीनुसार, इंडोनेशियातील कंजुरुहान स्टेडियममध्ये फुटबॉल सामना झाला. यावेळी अरेमा फुटबॉल क्लबचा त्यांचा कट्टर-प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पर्सेबायाकडून पराभव झाल्याने पर्सेबायाच्या समर्थकांनी मोठ्या फुटबॉलच्या मैदानामध्येच प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांवर हल्ला करत मोठा गोंधळ घातला. त्यामुळे दोन्हीकडूल गटामंध्ये मोठ्या प्रमाणात उसळलेल्यया हिंसाचारामध्ये 100 हून अधिक फुटबॉल चाहते आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे दैनिक स्टारने सांगितले आहे.



दरम्यान, या घटनेचा देशभरातून निषेध केला जात असून क्रिडा जगतातील दिग्गजांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies