Type Here to Get Search Results !

विटा: मालकाने पागर दिला नाही, म्हणून कामगारांनी चक्क तिजोरीच.....!



विटा: विटामध्ये मालकाने पागर दिला नाही, म्हणून कामगारांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली आहे. दोघेही आरोप 21 वर्षांचे असून ते बलवडी इथे राहणारे आहेत.



पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, विटामध्ये 9 ऑक्टोबरला शिवाजी नगर इथे असलेल्या जिओ मार्ट ऑनलाईन सेंटरमध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी जिओ मार्ट ऑनलाईन सेंटर दुकानाचे शटर फोडले होते. त्यानंतर सेंटरच्या आत प्रवेश करुन तब्बल 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तसेच, चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेत तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांची रोकडही लंपास केली होती.



दरम्यान, याप्रकरणी विटा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर विटा येथील पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान, पोलिसांनी दोघाजणांना अटक केली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies