Type Here to Get Search Results !

फील्ड फायरिंग सरावादरम्यान स्फोट; दोघा जवानांचा जळून मृत्यू!



नवी दिल्लीः झाशीजवळील बाबिना कॅन्टोन्मेंट येथे आज फील्ड फायरिंग सरावादरम्यान टी-90 टँकच्या बॅरलचा स्फोट झाला. यामध्ये एका जीसीओसह दोन भारतीय लष्कराच्या जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आल्याचे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.



माहितीनुसार, आज झाशीजवळील बाबिना कॅन्टोन्मेंटमध्ये फील्ड फायरिंगचा सराव केला जात होता. त्यावेळी भारतीय लष्कारातील तीन जवानाच्या आधारे एक टँक चालवला जात होता. त्यावेळी अचानक त्याचा स्फोट झाला. त्यावेळी मोठ्याने स्फोट झाल्याने त्या आगीत दोघा सैनिकांसह आणखी एक सैनिक त्या स्फोटात जळाला. त्यानंतर जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या लष्कर खात्याच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी सैनिकावर पुढील उपचार सुरू आहेत.



दरम्यान, फायरिंगचा सराव करताना ही घटना कशी घडली याचा सध्या तपास सुरू आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies