मुंबईः पुण्यात शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांचा सत्काराचा कार्यक्रम होता. पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळच्या भाषणात त्यांनी आई वडिलांना शिव्या द्या, ते चालेल… पण मोदी आणि अमित शहांना शिव्या दिलेलं सहन होणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
मराठी माणसं आई-वडिलांना शिव्या कधीही देत नाही. चंद्रकांतदादांचं हे वक्तव्य चुकीचं आहे. त्यातही मोदी-शहांची तुलना आई-वडिलांशी करणं हे अत्यंत चुकीचं आहे.मोदी आणि शहा हे राजकारणी आहेत. त्यांना शिव्या देणं वेगळा आशय आणि आई-वडिलांकडे केलेला हट्ट वेगळा विषय असतो, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले .