Type Here to Get Search Results !

बाळासाहेब असते तर ‘त्याना’ लाथ मारून बाहेर काढलं असतं!



मुंबई:  शिवसेनेच्या दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी भव्यदिव्य तयारी केली आहे. दसरा मेळावा सुरू होण्याआधीच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.



विनायक राऊत म्हणाले, ' शिवसेनेचा एकमेवर दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा आहे. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचे मॅनेजमेंट करतात. मात्र, शिंदे गट कंपन्या घेऊन कार्यक्रम मॅनेजमेंट करतात. बडगा आधी की कोडगा असा शिंदे गटाचा प्रकार आहे. बाळासाहेब असते तर त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं. नकली ते नकली असतात. त्यामुळे तलवार सुद्धा नकली ठेवली आहे'. 'आमच्या पूर्वजांनी मुंबई १०६ हुतात्म्यांनी बलिदान करून मिळवली आहे. आमच्या मनात चिड आहे की, मुंबई ज्यांनी विकायला काढली आहे, हा डाव मोडून काढायचा आहे. गद्दारांच्या डोळ्यात अंजन घालणारे गाणं आज प्रसिद्ध होईल. अशीच अनेक गाणी येत आहेत, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी टीका केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies