नवी दिल्ली : डिजिटल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरातील अनेक बँका घरोघरी जाऊन बँकिंग सुविधा देत आहेत. परंतु, ही सुविधा खास ग्राहकांनाच मिळते. सर्वसामान्य नागरिकांना, वृद्ध, अपंगांना या सुविधाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता अर्थमंत्रालयाचे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) लवकरच ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरु करणार आहे.
देशभरात सध्या 70 वर्षांवरील 5 कोटींहून ज्येष्ठ नागरिक आहेत. सरकार त्यांच्यासाठी खास सेवा सुरु करणार आहे. लवकरच सरकार त्यांना घरपोच बँकिंग सुविधा देणार आहे. अनेक शाखांमधून ही सुविधा उपलब्ध होईल.
घरपोच बँकिंग सेवा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाही तर अपंगांसाठीही सुरु करण्यात येत आहे. या सेवासाठी ग्राहकांना फार मोठे शुल्क देण्याची गरज नाही. यापूर्वी 31 डिसेंबर 2017 आणि नंतर 30 एप्रिल 2020 रोजी पर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. पण अद्याप ही सेवा सुरु करण्यात आलेली नाही.
याशिवाय डोअरस्टेप बँकिंग सुविधेसाठी एक युनिव्हर्सल फोन नंबरही देण्यात येणार आहे. त्याआधारे ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. ग्राहकांना या क्रमांकावर या सुविधेसाठी फोन करता येईल.