Type Here to Get Search Results !

शिंदे गटाच्या मेळाव्यात स्टेजवर बाळासाहेबांची खास खुर्ची; तर ठाकरेंच्या मेळाव्यात....!



मुंबई:  शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी भव्यदिव्य तयारी केली आहे. 



तसेच या मेळाव्यास सुरुवात झाली असून  ठाण्यातील सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली खुर्ची शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या स्टेजवर ठेवण्यात आली आहे. याशिवाय, खुर्चीवर भगवी शाल आणि फुलांचा हार ठेवण्यात आला आहे.



त्याचप्रमाणे, ठाकरेंच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies