Type Here to Get Search Results !

अंधेरी पोटनिवडणुक: ‘यामुळे’ उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देणार?



मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गट भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याविरोधात आक्षेप घेण्याच्या तयारीत आहे. मुरजी पटेल यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे हा आक्षेप घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.



दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून मुरजी पटेल यांच्यावर आक्षेप घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप नाईक हे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या चार ते पाच विषयांवरील आक्षेपासंदर्भात माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies