Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार ०२ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष :

ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल. वृषभ:

जवळचा प्रवास सुखाचा होईल.  हातातील काम पूर्ण होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मिथुन:

दिवसभर कामाची लगबग राहील. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.  दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. सहकार्‍यांना कमी लेखू नका. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कर्क:

कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. धावपळीचा दिवस राहील. मित्राची गाठ पडेल. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. सिंह:

फार काळजी करू नये. सरकारी कामे पुढे सरकतील. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. कन्या:

अधिकची कामे अंगावर पडतील. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. तुमची प्रतिमा उंचावेल.  विजय तुमचाच होईल. तूळ:

दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा. निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी.  घरात शांतता ठेवावी. वृश्चिक:

खोट्या गोष्टींचा आधार घ्याल. नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. धनू:

कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. नवीन ओळख वाढवताना सावध रहा.  दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. मकर:

प्रलोभनाला भुलू नका. नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. आनंदी मनाने कार्यरत राहाल.दिवस उत्साही असेल. कुंभ:

जि‍भेवर ताबा ठेवावा. रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. आव्हानांचा सामना करावा. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. मीन:

आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. आत्ममग्न राहाल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies