Type Here to Get Search Results !

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने मुलांसह केली आत्महत्या!



नाशिक - सिन्नर तालुक्यातील मोह गावालगत असलेल्या पाझर तलावात तीस वर्षीय महिलेसह तिच्या दहा वर्षांची मुलगी व आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पती व सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.



माहितीनुसार, सिन्नर - नाशिक महामार्गावरील मोह येथील ज्योती होलगीर या मुलगी गौरी आणि मुलगा साई यांच्यासह शनिवारी दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे सासरे पांडुरंग कारभारी होलगीर यांनी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होलगीर वस्ती जवळ असलेल्या पाझर तलावाच्या पाण्यावर या तिघांचेही मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. स्थानिक तरुणांच्या मदतीने तिघांचे पाण्याबाहेर काढून सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिघांनाही मयत घोषित केले.




दरम्यान, मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies