Type Here to Get Search Results !

कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तर ७ जण जखमी!



मुंबई: मुंबईच्या विक्रोळी दरम्यान आज, गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास इस्टर्न फ्री-वे वर इनोव्हा गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, या गाडीमधील सर्वजण हे भिवंडी येथील ढाब्यावर जेवणासाठी निघाले होते. यावेळी मुंबईच्या विक्रोळी दरम्यान इस्टर्न फ्री-वे वर इनोव्हा गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आणि गाडी सर्विस रोडवरील झाडावर जाऊन आदळली. या अपघातात शाहिद सलिम कुरेशी वय १८, आणि जुनेद सलीम कुरेशी वय २६ या दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर अपघातात  आमान अब्दुल गफार कुरेशी-१९, साजिद अनिस अहेमद अन्सारी-१५, शाहिद मो. सलीम कुरेशी-१८, आयान कुरेशी-१८, कैफ शरीफ कुरेशी-१७, शाहिद अहमद अनीस अन्सारी-१७, अलीम जाकीर कुरेशी-२१ हे जखमी झालेले आहेत.



दरम्यान, मुंबई नियंत्रण कक्षातर्फे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  अपघातात ही सर्व मुलं कुर्लाच्या कुरेशी नगरमधील राहणारी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies