Type Here to Get Search Results !

आता पॉलिटेक्निकचे शिक्षण मिळणार मराठीतून:मंत्री चंद्रकांत पाटील!

 


नाशिक : येत्या 31 डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व पुस्तके मराठीतून मिळतील, त्यामुळे पॉलिटेक्निक शिक्षण सहज आणि सोपे होईल, विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. इंग्रजीमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी शक्यतो मराठी शिकवावं. ते जर इंग्लिशमध्ये शिकवणार असेल तर इंग्लिशमध्ये शिकवलेलं मराठीत भाषांतर होण्यासाठी डिवाइस देणार येणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. 



तसेच,  काही नवीन अभ्यासक्रम आता सुरू करण्यात येणार असून या अभ्यासक्रमांमुळे शिक्षणांबरोबर व्यक्तिमत्व विकास देखील झाला पाहिजे. शिक्षणात स्किल डेव्हलपमेंटचे विषय देखील राज्यातील विद्यापीठांनी घ्यावे, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.



दरम्यान, लघुउद्योग भारती नाशिक इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च 2022 स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिकमध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies