Type Here to Get Search Results !

....म्हणून पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर दसरा मेळाव्यात उडाला गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज!




बीड : बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा होता. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर दसरा मेळाव्यात गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.  



माहितीनुसार, आज पंकजा मुडें याचा सावरगावमध्ये दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने  गर्दी केली होती. पंकजा यांच भाषण देखील झाले. मात्र भाषणापूर्वीच काही तरुण आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी करत पोलीस आणि कार्यकर्त्यांना शांतही केले . 



दरम्यान,  दसरा मेळाव्याला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत सेल्फीचा आग्रह धरला, सेल्फी घेण्यासाठी स्टेजकडे धाव घेतली, आणि यातूनच हा गोंधळ उडाल्याची माहिती समोर येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies