मुंबई: निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. ठाकरे गटाला नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या,' 'एक गाणं आहे, ते गाणं हे वेगळ आहे. काळरात्र होता होता, उष:काल झाला. अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली. पेटवा मशाली. आपल्याला शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. खरी लढाई पहिलाी जिंकली आहे. 'आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून प्रत्येक घराघरात मशाल हे चिन्ह जे देवीच्या, देवदेवतांच्या ठिकाणी लावून उजेड केला जातो. ज्यांनी आपल्या पक्षात काळरात्र करण्याची ठरवली. तो उष:काल आता सुरू झाला आहे. आता पेटवा आयुष्याच्या मशाली आणि दाखवा ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे, अये त्यांनी वक्तव्य केले.