Type Here to Get Search Results !

जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया!



मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची  माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. या धमकी प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'धमक्यांना मी घाबरत नाही. मुख्यमंत्री नव्हतो, त्यावेळी देखील धमक्या आल्या होत्या. त्या धमक्यांचा परिणाम होत नाही. जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर लक्ष देखील देत नाही. या प्रकरणात पोलीस काम करत आहेत. तसेच गृहविभाग या प्रकरणात काम करत आहे'. 'याआधी देखील नक्षलवाद्यांच्या धमक्या आल्या आहेत. काही देश विघातक शक्तींनी प्रयत्न केला आहे. ज्यावेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. त्यामुळे माझ्यासाठी नवीन नाहीये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.



दरम्यान, मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies