Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार ०३ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. घाईने कामे उरकू नका. सहकार्‍यांच्या हातात हात घालून चला. 



वृषभ:

कामे गतीने पूर्णत्वास जातील. अकारण पैसा खर्च होऊ शकतो. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. 



मिथुन:

मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल. खाण्यापिण्याची चंगळ राहील.  जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. 



कर्क:

जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.  उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. नातेवाईकांची गाठ पडेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. 



सिंह:

जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 



कन्या:

मनातील निराशाजनक विचार काढून टाका.  आपल्या कामात यश मिळेल. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. 



तूळ:

समस्यांना संयमाने तोंड द्या. कौटुंबिक खर्च निघतील. झोपेची तक्रार जाणवेल. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकनवरती प्रभाव पाडाल. 



वृश्चिक:

आर्थिक चिंता मिटेल. लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. फक्त कामावरच लक्ष केद्रिंत करा.  अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. 



धनू:

विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. मदत केल्याचा आनंद मिळवाल. तरुणांच्या सहवासात रमाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. 

मकर:

गरज नसेल तर प्रवास टाळावा. नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. भावंडांशी मतभेद टाळा.  कमिशन च्या व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. 



कुंभ:

जुन्या विचारांना चिकटून राहू नका. मनातील निर्णय जोडीदारासमोर मांडा. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.  तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या. 




मीन:

उष्णतेचे त्रास संभवतात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड करा. योग्य संधीची वाट पहावी.  जोडीदाराशी शांतपणे वार्तालाप करा. अती उत्साह दाखवायला जाऊ नका. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies